Ad will apear here
Next
लॉकडाउन
   ," अरे, किती वेळ झाला.अजून हा कसा आला नाही घरी.सरोज बघ गं जरा फोन कर अशोकला" सासुबाई म्हणाल्या.  
," हो..हो ..करते हा."म्हणत सुनबाईंनी फोन लावला.त्या दोघांचे फोनवर संभाषण झाले.आणि तिने फोन ठेवला.आणि तिचा चेहरा पडला.तिच्या मनाची चलबिचल सुरू झाली.   
," अगं काय झाले.काय म्हणाला ? का उशीर होत आहे ग?"  
  ' अहो आई उद्या पासून पुन्हा एकदा लाकडाऊन सुरू होणार आहे.मग सारे काम पुर्ण करुन येतो म्हटले.   
‌," अरे देवा परमेश्वरा . पुन्हा लॉकडाऊन.का रे ऐवढां छळ मांडला आहे या विषाणूने.आणखी किती बळी घेणार आहे.देवा बस झाले रे आता.नको आणखी काही दाखवू या म्हाताऱ्या डोळ्याला," म्हणत सासुबाई देवासमोर जाऊन हात जोडून उभ्या राहिल्या. 
   सरोजला पहिला लॉकडाउन आणि अशोकची होणारी चिडचिड आठवली.अगदी शुल्लक कारणावरून वाद घालायचा.चिडायचा.घरात एकदम वातावरण बिघडू लागले होते. 
  त्याचे कारणही तसेच होते.अशोक हा शिंदे कुटुंबाचा एकुलता एक मुलगा.तो लहान असतानाच त्याचे वडील अचानक वारले होते.वडिल वारल्यानंतर त्यांच्या हक्काच्या घरातील वाटणीतून त्याच्या मोठ्या काकाने बाहेर केले.कारण हे सांगितले कि माझ्या भावाला हिनेच म्हणजे अशोकच्या आईनेच मारले.त्याच्या पैसे आणि घरासाठी.   बिचारी आई आपल्या लहान मुलाला घेऊन आपल्या आईकडे गेली.तिथे एका शाळेत आयाचे काम करुन अशोकला सांभाळू लागली. 
  अशोक अभ्यासात हुशार होता.मनलावून अभ्यास करत होता.शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता.   दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला.अगदी नावाजलेल्या कॉलेज मध्ये अॅडमीशन घेतले.तिथे ही तो आपल्या अभ्यासु वृत्तीमुळे एकदम टॉपचा विद्यार्थी बनला. 
  कॉलेजमध्ये त्याचे कॅम्पस सिलेक्शन झाले आणि चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली.  
 सगळेजण आईचे पांग फेडले पोराने म्हणत अभिनंदनाचा वर्षाव केला.नोकरी साठी आईलेक शहरात जाऊन राहू लागले.    
बघता बघता चार वर्षे झाली.आता त्याचा कंपनीत प्रमोशन पण झाले.चांगल्या घराच्या मुलींची स्थळे लोक सुचवू लागली.   
 मग एक सुशिक्षित चांगल्या स्वभावाची मुलींबरोबर लग्न झाले.लक्ष्मीच्या पायाने सुन घरात आली आणि अशोकला दुसऱ्या मोठ्या कंपनीत आहे त्या पगारापेक्षा जास्त पगार आणि मोठी पोस्ट याची आॅफर आली. 
   " लक्ष्मीच गं तु माझी" म्हणत सासुबाईनी सुनेला घट्ट मिठी मारली.  
  " आई ,आई..   आज संध्याकाळी तुम्ही दोघी तयार रहा .मी लवकर येणार आहे घरी.जरा बाहेर जायचं आहे" " अरे मला कशाला म्हातारीला बाहेर नेतोस.तु आणि सुनबाई जा.मी घरीच बसते देव देव करत"  
  " ये आई उगीच भाव खाऊ नकोस हां.जायच म्हणजे जायचं" म्हणत अशोकने लहान बाळासारखा आईचा गालगुच्चा घेतला आणि कामाला गेला. 
  " लग्न झाले तरी याचा पोरकटपणा काही गेला नाही" म्हणत हसतच सासुने सुनेकडे पाहिले सुन लाजत आत गेली.  
    टिंग टॉंग...  
 आला वाटतं अशोक.चल गं लवकर म्हणत आईने दार उघडले.  
  चला,चला लवकर उशीर होतोय.मी बाहेर टॅक्सी उभी करून आलो आहे. 
  ‌आणि हे तिघे टॅक्सी मध्ये बसले.  
   आणि टॅक्सी एका मोठ्या बिल्डिंगच्या समोर उभी केली.चल आई म्हणत अशोकने आईचा हात धरला.हळूहळू आई चालू लागली.,
" अरे बाळा कोणाची ही बिल्डिंग.कोणाकडे जातो आहे आपण.आधिच सांगितले असतेस तर काही तरी करून घेतले असते ना.असे मोकळ्या हातांनी कोणाच्या घरी जाणे बरे नाही वाटत"   
  आई आपले बोलतच होती हा ऐकून न ऐकल्यासारखे तिला लिफ्ट मध्ये घेऊन गेला.  
  लिफ्ट थांबली आणि हे तिघे चालत चालत एका फ्लॅट समोर आले.अशोकने बेल वाजवली तसे आतून एका युवकाने दार उघडले.वेलकम इन युवर होम... 
   एकदम गुलाबाच्या पाकळ्यांचा आईवर वर्षाव झाला.आईला काहीच कळेना.  
  हे तिघे आत गेले.अशोकने आईला एका आलिशान खुर्चीवर बसवले आणि आपण तिच्या मांडीवर डोके ठेवून" आई ..आई.हे तुझे स्वत: चे घर आहे.आता तुला येथून कोणी ही बाहेर काढणार नाही.तु या घरची मालकीन आहे.ही घे चावी"  
 आईच्या आणि सुनेच्या डोळ्यात अश्रू धारा सुरू झाल्या.     नव्या घरात शिफ्ट झाले.आता हे तिघांचे चार झाले.इवलीशी परीराणी यांच्या आयुष्यात आली.    अशोकने मोठी कार घेतली.अगदी दृष्ट लागावी असे त्यांचा संसार सुरू होता.त्याचे घराचे ,गाडीचे हप्ते , मुलींच्या शिक्षणासाठी काही ठेव.मोठ्या सोसायटीत वावरणे त्यामानाने राहणीमान.अगदीच व्यवस्थीत जम बसला होता.आणि.... 
   आणि अचानक हा जीवघेणा विषाणू कोराना आला.त्याने सगळीकडे हाहाकार माजला.कोरोनामुळे भलीभली लोक गळून पडले.कितीजणाचे बिझनेस उध्वस्त झाले.ज्यांची हातावरची पोट होती त्यांना तर खुपचं वाईट दिवस आले.   
 भल्या भल्या कंपन्यांना नुकसान होऊ लागले.काही काही कंपन्यांनी लोकांना कामावरून काढून टाकायचा निर्णय घेतला.    आणि अशोकच्या डोळ्यासमोर जर आपल्या कंपनीने आपणास कामावरून काढून टाकले तर काय होईल? हा प्रश्न आ वासून उभा होता.   घराचे,गाडीचे हप्ते कसे फेडू मी.काय होईल? या प्रश्नांनी त्याचा स्वभाव साहजिकच चिडचिडा बनला होता.   
    ते दिवस आठवले आणि सरोज एकदम सुन्न झाली.     दाराची बेल वाजली.अशोक आत आला.झोपली वाटते छकुली.म्हणत बॅग टेबलावर ठेवली. 
  हो आताच झोपली.जा तुम्ही फ्रेश व्हा.मी जेवणाचे बघते.आई पण जेवल्या नाहीत.  
 अरे आई तु का बसलीस न जेवता.   
 नाही रे बाळा.काळजी वाटते.पुढे काय होणार.  
  " ये आई काहीही काळजी करु नको.काही होणार नाही.हे बघ आता जरा पेशंट जास्त प्रमाणात मिळत आहेत न म्हणून फक्त आठ दिवसांचा लॉकडाउन आहे.आणि मला वर्क फ्रॉम होम हे आॅपशन दिले आहे.मी घरातुन काम करु शकतो.तु काही काळजी करू नको" म्हणत अशोक आत रुम मध्ये गेला.   
    जरी तो असा म्हंटला तरी या तिघांच्या मनात एक भितीचा ठोका उठतच होता.एक न संपणारी काळजी जी तिघांच्या मनात वाळवीसारखी पोखरत होती.  
  ©® परवीन कौसर....
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KYDLCO
Similar Posts
कान्हा.. कथेतील पात्र रुबीना जिचे गर्भाशय कमकुवत असल्याने वारंवार मिसकेरेज होत होते.शेवटी डॉ.नीं गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला.या संदर्भात ही कथा आहे.
पत्रिका.... दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.दोघे लग्न करणार होते.पण फक्त पत्रिका न मिळाल्याने झाले नाही.पण त्यांनी आपले प्रेमाची नावे आपल्या मुलांना देऊन प्रेम अमर केले.अशी ही कथा आहे.
कान्हा.. कथेतील पात्र रुबीना जिचे गर्भाशय कमकुवत असल्याने वारंवार मिसकेरेज होत होते.शेवटी डॉ.नीं गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला.या संदर्भात ही कथा आहे.
डॉ.मला बाळ हवंय...भाग २ ही कथा आहे एका रमा नावाच्या तरुणीची.तिच्या नवऱ्यामध्ये दोष असले मुळे ती आई बनून शकली नाही.पण समाज तिलाच वांझ, वांझोटी असे म्हणून हिणवत होते....पण तिच्या सासऱ्यांना जेव्हा हे सत्य कळते तेव्हा ते मुलीला दत्तक घेऊन रमाला सगळ्यांसमोर तीचा आई होण्याचा सन्मान करतात.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language